सुवर्ण श्री स्व. प्रतापशेठ(दादा) साळुंखे

सांगली हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा भौगोलिक परिस्थिती पाहता या जिल्ह्याचा निम्म्यापेक्षा अधिक भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. खानापूर, आटपाडी, जत यांसारखे तालुके नेहमीच दुष्काळग्रस्त तालुके म्हणून ओळखले जातात. परिणामी उदरनिर्वाह करण्यासाठी या तालुक्यातील बरेचसे लोक स्थलांतर करत असतात. फार पूर्वीपासून इथल्या लोकांनी आपल्या जिद्दीच्या, इच्छाशक्तीच्या आणि प्रदत्तांच्या जोरावर निसर्गावर मात करून संपूर्ण भारतभर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आज संपूर्ण भारतभर पाहिले असता तर गलाई व्यवसायाच्या निमित्ताने खानापूर, विटा, आटपाडी या भागातील लोक पसरले आहेत व त्यांनी तेथे असणाऱ्या परिस्थितीशी सामना करून गलाई व्यवसायात आपले नाव टिकून ठेवले आहे.

गलाई व्यवसायाचा इतिहास पाहिला तर मूळचा इराणी लोकांचा हा व्यवसाय, मुंबई येथे झवेरी बाजारात एका इराणी माणसाचे आटणीचे दुकान होते. या इराणी माणसाला मूलबाळ नसल्याने, त्याच्या दुकानात काम करणारे वेजेगावचे महादेव गुरव यांच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. याच काळात महादेव गुरव यांनी आटणीची सर्व कामे अगदी मनापासून शिकून घेतली. एके दिवशी हा इराणी माणूस हज यात्रेला गेला व दुकानाची जबाबदारी त्याने महादेव गुरव यांच्याकडे सोपवली. तेथूनच मराठी माणसाचे गलाई व्यवसायात महादेव गुरव यांच्या रूपाने पहिले पाऊल पडणे, तिथून सुरु झालेला हा प्रवास आज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक दिग्गज मंडळींनी यामध्ये नाव कमावले आहे. यामध्ये प्रतापसेठ दादा साळुंखे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. सुवर्ण दुनियेत प्रतापशेठ दादा यांचे नाव संपूर्ण भारतात आदराने घेतले जाते. दादांच्या जीवन कार्याविषयी माहिती.

दूरदृष्टी असलेले एक व्यक्तीमत्व ...

खानापूर, आटपाडी, माण, खटाव,तासगाव या दुष्काळी तालुक्यातील लोकांना गलाई व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी देशभर स्थिर स्थावर केले. गलाई व्यवसायाचे भीष्माचार्य म्हणून त्यांना ओळखले जाते. अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. परिस्थितीवरती मात करीत त्यांनी केरळ राज्यात आपला व्यवसाय सुरू केला आणि नावलौकिकास आणला. राजमान्यता यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०१६ ने दिली. आपल्या बरोबर आपला दुष्काळी समाज पण सुधारला पाहिजे. म्हणून त्यांनी दुष्काळी भागातील हजारो कुटुंब या व्यवसायाच्या निमित्त काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत उभी केली. त्यांच्या हाताला काम दिले. परमुलखात व्यवसाय करीत असताना याच संकटाला तोंड द्यावे लागेल,अन्याय सहन करावा लागेल. गलाई तामिळनाडू, केरळ कार्यक्षेत्र असणारी व्यावसायिकांना एकत्रित करून 'नॅशनल गोल्ड, सिल्व्हर रिफायनरी ज्वेलर्स असोसिएशन' ह्या देश पातळी वरील संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे गलाई व्यवसायिकांना एकत्रीत करून समस्या सोडविण्याचे काम केले. आपल्या लोकांना आर्थिक पाठवळ मिळावे म्हणून 'शिवप्रताप मल्टीस्टेट' या संस्थेची स्थापना केली. ज्याद्वारे लोकांना त्यांचे आर्थिक गरजा भागवण्याचे काम केले व सोने तारण कर्जातील खाजगी सावकरांची मक्तेदारी मोडीत काढली. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. ज्याची उलाढाल ७०० कोटी रुपयांपर्यंत असूनसुसज्य मुख्य कार्यालय व २३ शाखांद्वारे व्यवसाय चालतो. शेतकऱ्यांना कमी दरात खते बी-बियाणे औजारे मिळावे. योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून शिवप्रताप अग्रोटेक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. आपल्या संपूर्णजीवनात आपण समाजाचे काहीतरीदेणे लागतो या 'भावनेने काम केले. भागातील मंदिरे उभारणी असुदे सामाजिक मंदिरे असू देत ते उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले. प्रत्येक वर्षी मोठे महा आरोग्य शिबीरे घेवून रुग्णांना मोफत तपासणी उपचार व शस्त्रक्रिया मोफत करून दिले. दुष्काळाच्या काळात चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे वाटप. चारा वाटप मोठ्या प्रमाणात करीत असत. कोरोनाच्या महाभयंकर संकटात त्यांनी आपल्या शिवप्रताप मानव कल्याण ट्रस्टच्या माध्यमातून अन्न धान्य वाटप, औषध गोळ्यांचे वाटप, मास्क वाटप ही मोठ्या प्रमाणात केले होते. आशा सेविकांनी कोरोना काळात मदत म्हणून चार हजार रुपये इतके मानधन दिले होते. अश्या या परोपकारी, दूरदृष्टी असणारे, अजात शत्रू असणारे असणाऱ्या स्वर्गीय प्रतापशेठ दादांचा जीवनप्रवास या वेबसाईट च्या माध्यमातून जगभरातील आपल्या बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक पाऊल.

अधिक माहिती

Interaction

सुवर्ण श्री. स्व. प्रतापशेठ(दादा) साळुंखे