सुवर्ण श्री स्व. प्रतापशेठ(दादा)साळुंखे

दूरदृष्टी असलेला एक व्यक्ती....

नॅशनल गोल्ड सिल्व्हर रिफायनरी ज्वेलर्स असोसिएशनचे संस्थापक, * शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक, शिवप्रताप शालीमार उद्योग समूहाचे प्रणेते, पारे गावचे सुपुत्र आणि जेष्ठ गलाई व्यावसायिक प्रताप (शेठ) दादा यांचे गेल्या वर्षी पूर्वी निधन झाले १७ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रथम पुण्य स्मरण .

खानापूर, आटपाडी, माण, खटाव,तासगाव या दुष्काळी तालुक्यातील लोकांना गलाई व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी देशभर स्थिर स्थावर केले. गलाई व्यवसायाचे भीष्माचार्य म्हणून त्यांना ओळखले जाते. अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. परिस्थितीवरती मात करीत त्यांनी केरळ राज्यात आपला व्यवसाय सुरू केला आणि नावलौकिकास आणला. राजमान्यता यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०१६ ने दिली. आपल्या बरोबर आपला दुष्काळी समाज पण सुधारला पाहिजे. म्हणून त्यांनी दुष्काळी भागातील हजारो कुटुंब या व्यवसायाच्या निमित्त काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत उभी केली. त्यांच्या हाताला काम दिले. परमुलखात व्यवसाय करीत असताना याच संकटाला तोंड द्यावे लागेल,अन्याय सहन करावा लागेल. गलाई तामिळनाडू, केरळ कार्यक्षेत्र असणारी व्यावसायिकांना एकत्रित करून 'नॅशनल गोल्ड, सिल्व्हर रिफायनरी ज्वेलर्स असोसिएशन' ह्या देश पातळी वरील संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे गलाई व्यवसायिकांना एकत्रीत करून समस्या सोडविण्याचे काम केले. आपल्या लोकांना आर्थिक पाठवळ मिळावे म्हणून 'शिवप्रताप मल्टीस्टेट' या संस्थेची स्थापना केली. ज्याद्वारे लोकांना त्यांचे आर्थिक गरजा भागवण्याचे काम केले व सोने तारण कर्जातील खाजगी सावकरांची मक्तेदारी मोडीत काढली. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. ज्याची उलाढाल ७०० कोटी रुपयांपर्यंत असून सुसज्य मुख्य कार्यालय व २३ शाखांद्वारे व्यवसाय चालतो. शेतकऱ्यांना कमी दरात खते बी-बियाणे औजारे मिळावे. योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून शिवप्रताप अग्रोटेक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली

आपल्या संपूर्ण जीवनात आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या 'भावनेने काम केले. भागातील मंदिरे उभारणी असुदे सामाजिक मंदिरे असू देत ते उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले. प्रत्येक वर्षी मोठे महा आरोग्य शिबीरे घेवून रुग्णांना मोफत तपासणी उपचार व शस्त्रक्रिया मोफत करून दिले. दुष्काळाच्या काळात चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे वाटप. चारा वाटप मोठ्या प्रमाणात करीत असत. कोरोनाच्या महाभयंकर संकटात त्यांनी आपल्या शिवप्रताप मानव कल्याण ट्रस्टच्या माध्यमातून अन्न धान्य वाटप, औषध गोळ्यांचे वाटप, मास्क वाटप ही मोठ्या प्रमाणात केले होते. आशा सेविकांनी कोरोना काळात मदत म्हणून चार हजार रुपये इतके मानधन दिले होते. अश्या या परोपकारी, दूरदृष्टी असणारे, अजात शत्रू असणारे व्यक्तीचे आज प्रथम पुण्य स्मरण त्या निमित्ताने त्रिवार अभिवादन...


1940

जन्म व बालपण

खानापूर तालुक्यातील पारे या गावी महादेव साळुंखे व पार्वती साळुंखे या दाम्पत्याच्या पोटी दिनांक 26 मार्च 1940 रोजी दादांचा जन्म झाला. तत्कालीन परिस्थिती पाहता तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता. त्याकाळी महादेव साळुंखे यांचे चुलते चेन्नईमध्ये गलाई व्यवसायात होते. भाऊबंदकीच्या नादात महादेव साळुंखे यांची फसवणूक झाली होती. घरची परिस्थिती बेताची होती. महादेव साळुंखे हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. अशा वेळी मुलांना शिकायची ईच्छा प्रचंड होती. मात्र परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नव्हते. अशा वेळी वयाच्या केवळ १३ व्या वर्षी नशीब बदलण्यासाठी महादेव साळुंखे यांचे जेष्ठ चिरंजीव प्रताप यांनी केरळात जायचे ठरविले. खरं तर खेळण्या बागडण्याच्या वयात आपण सुवर्ण व्यवसाय करावा व आपल्या कुटुंबाला चांगले दिवस आणावेत हा दूरदृष्टीचा विचार प्रतापशेठ दादांनी तेव्हा केला. त्यामुळे हा मुलगा भविष्यात खूप मोठी झेप घेईल, याची जाणीव वयाच्या १३ व्या वर्षीच सर्वांना झाली.

व्यवसायाची सुरवात व स्थिरता

१९५४ साली १३ व्या वर्षी प्रतापशेठ दादाना मामानी व्यवसायासाठी दिलेले १००० रु व मित्र कृष्णासोबत दादा अलेप्पी ला आले. या ठिकाणी १५ रु माब्याने १ गुंठा जमीन घेऊन नारळाच्या झावळ्यांचा कूड घेऊन दुकान सुरु केले. राहण्यासाठी मंदिराचा आसरा घेऊन समोर असणाऱ्या तळ्यात अंघोळ करणे हा नित्याचा कार्यक्रम, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत दुकान सुरु केले. मात्र सुरुवातीला २ महिने काहीच काम नव्हते. कालांतराने हळूहळू कामे येऊ सागली. व्यापारी विश्वास ठेवू लागले. मात्र अलेप्पीला व्यवसायाच्या मर्यादा येऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी एर्नाकुलम या ठिकाणी जायचा निर्णय घेतला. व्यवसाय वाढला पाहिजे ही जिद्ध मनाशी बाळगली असल्याने दादांची पावले त्या दृष्टीने सातत्याने पडत होती. आणि त्यांना यशही येत होते. त्यामुळे दादांनी गलाई रिफायनरी व्यवसाय वाढविला. याशिवाय कोचिन येथे ते सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या व्यसायातही स्थिरावले. असे असले तरी आपल्या सोबत आपला समाजही मोठा झाला पाहिजे. आपल्या समाजातील कुटुंबे सुधारली पाहिजेत, अशा विचारांचे दादा होते. त्यामुळे सुरवातीला त्यांनी आपल्या गावाकडच्या मुलांना आपल्या दुकानात कामासाठी नेले. त्यांना कामात तरबेज केले व त्या मुलांना स्वतःची दुकाने काढून दिली. अशी एक नव्हे, दोन नव्हे, हजारो मुले दादांनी नेली व त्यांना भारतभर स्वतःची दुकाने काढून दिली. खर तर आपल्यासोबत इतरांचाही विकास झाला पाहिजे, इतर कुटुंबे ही सुधारली पाहिजेत, असा विचार करणारे व्यक्तिमत्व दादा होते. आज कित्येक लोक असे म्हणतात की, प्रतापभेठ दादांच्या दुकानात आडलोट करायना असणारी मुले करोडपती आहेत. मात्र याचे सारे श्रेय वादा नम्रपणणे त्या मुलांच्या कष्टाला देतात.
१९५४
२०००

एक पाठबळ आपल्या माणसांना सक्षम करण्यासाठी

उद्योग-व्यवसाय, संस्थाची उभारणी
व्यवसायाच्या निमित्ताने दादांनी विविध संस्था उभारल्या आहेत. यामध्ये सुवर्ण व्यवसायाशी संबंधित 'ऑल इंडिया गोल्ड रिफायनरी अँड सिल्वर असोसिएशन 'ही संस्था उभी करून त्यांनी भारतातील सर्व गलाई व्यावसायिकांना एकत्र आणले आहे. शिवाय या संघटनेला त्यांनी शासकीय दर्जा मिळवून दिला. व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दादा कटिबद्ध असतात.शिवप्रताप मानव कल्याण संस्थेअंतर्गत अनेक सामाजिक कामे केली आहेत. मैनैसर्गिक आपत्तीच्या काळात ही संस्था जनतेच्या मदतीसाठी सर्वात पुढे असते. आरोग्य शिबीरे राबवून गरजवंतांना मोफत आरोग्य सुविधा या संस्थेमार्फत दिल्या जातात. याशिवाय कोरोनाच्या काळात, पुरपरिस्थितीत, दुष्काळात नागरिकांना मदतीसाठी संस्था पुढे असते.नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी शिवप्रताप पतसंस्था कार्यरत असून महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना पतसंस्था सेवा देत आहेत. इतक्या मोठ्या पतसंस्थेची जबाबदारी वादांनी आपले पुतणे विठ्ठल साळुंखे यांच्यावरती सोपवीती आहे. या बँकेच्या माध्यमातून दादांनी हजारो होतकरू तरुणांना रोजगार उपलब्ध करून त्यांची कुटुंबे उभी केली.शिवप्रताप ऍग्रोमॉलच्या रूपाने शेतकयांना एक सुवर्ण संधी लाभली आहे. शेतीची अवजारे, औषधे व मातीपरीक्षण इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय आधुनिक शेतीचे मार्गदर्शन येथून शेतकऱ्यांना केले जाते.शिवप्रताप अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. याशिवाय शालिमार बॉच, शालिमार ज्वेलर्सच्या माध्यमातून ग्राह‌कांना उच्चतम सेवा दिली जाते. नजीकच्या काळात जनतेच्या सेवेसाठी उच्चतम सेवा पुरवणारे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल विटा या ठिकाणी उभारले जाणार आहे.एकंदरित अगदी शून्यातून सुरुवात करून आपल्या ध्येयाप्रती पोहोचण्यासाठी दादांची असलेली जिह, चिकाटी तळमळ आणि प्रयव हे सारे काही स्वप्रवत वाटत असेल तरी हे सत्य आहे.
सुवर्ण श्री. स्व. प्रतापशेठ(दादा) साळुंखे